बातम्या
“कोल्हापूरात आरोग्यसेवेत नवा अध्याय – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची आन्सी वेलनेसला भेट;
By Administrator - 9/16/2025 3:00:57 PM
Share This News:
“कोल्हापूरात आरोग्यसेवेत नवा अध्याय – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची आन्सी वेलनेसला भेट;
नॉन सर्जिकल स्पायनल डिकम्प्रेशन थेरपी शासकीय योजनेत समाविष्ट होणार?”
कोल्हापूर, १५ सप्टेंबर – महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय श्री. प्रकाशराव अबीटकर यांनी सोमवारी आन्सी वेलनेस कोल्हापूर सेंटरला भेट देऊन शस्त्रक्रियाविरहित पाठीच्या कण्यावरील आधुनिक उपचारपद्धतीचा अभ्यास केला.
आन्सी वेलनेसतर्फे राबवली जाणारी नॉन सर्जिकल स्पायनल डिकम्प्रेशन थेरपी ही पाठीचा त्रास, स्लिप डिस्क, सायटिका, मान व कंबर दुखी यांसारख्या विकारांवर अत्यंत प्रभावी ठरते. सादरीकरणाद्वारे अबीटकर यांना दाखवण्यात आले की, या उपचाराने अनेक रुग्णांना ८० ते ९० टक्क्यांपर्यंत आराम मिळतो आणि महागड्या शस्त्रक्रियेची गरज भासत नाही.
या थेरपीच्या परिणामकारकतेबद्दल समाधान व्यक्त करत पालकमंत्री अबीटकर म्हणाले, “पाठीच्या कण्याचे विकार झपाट्याने वाढत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना शस्त्रक्रियाविना आधुनिक उपचार मिळावेत, यासाठी ही पद्धत शासकीय आरोग्य योजनांमध्ये समाविष्ट करण्याचा विचार आहे.”
भेटीदरम्यान आन्सी वेलनेसचे संस्थापक . दिनेश दळवी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील विविध केंद्रांवर हजारो रुग्णांना याचा लाभ झाला असून, पुढील टप्प्यात ग्रामीण भागातही हे उपचार पोहोचवले जाणार आहेत.
या कार्यक्रमाला संजय गांधी निराधार समिती, भुदरगडचे अध्यक्ष विक्रमसिंह पाटील, तसेच आन्सी वेलनेसचे सहसंस्थापक सुमेध स्थूल, मयूर गाजरे, श्रीकांत लोणकर, नसरोद्दिन शेख, महेंद्र सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर सेंटरचे महाव्यवस्थापक इंद्रजीत शिरगावकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे संयोजन केले.
शेवटी पालकमंत्री अबीटकर यांनी आन्सी वेलनेसच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि आरोग्यसेवेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.
या भेटीद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्यसेवेत आधुनिक व शस्त्रक्रियाविरहित उपचारपद्धतीचा नवा अध्याय सुरू झाला असून, पाठीच्या कण्याच्या विकारांनी त्रस्त रुग्णांसाठी हा उपचार आशेचा किरण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
“कोल्हापूरात आरोग्यसेवेत नवा अध्याय – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची आन्सी वेलनेसला भेट;
|