बातम्या
CSR निधीतून विकासाला नवी दिशा; शिक्षणापासून रोजगारापर्यंत १० क्षेत्रांत परिवर्तनाचा संकल्प
By nisha patil - 10/28/2026 6:38:52 PM
Share This News:
CSR निधीतून विकासाला नवी दिशा; शिक्षणापासून रोजगारापर्यंत १० क्षेत्रांत परिवर्तनाचा संकल्प
महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनचा व्यापक विकास आराखडा; ग्रामीण, वंचित, महिला, युवक, विद्यार्थी व माजी सैनिकांसाठी विविध उपक्रमांचा समावेश
कोल्हापूर : शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, क्रीडा, कला-संस्कृती, ग्रामीण विकास, झोपडपट्टी विकास तसेच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून विविध विकासात्मक प्रकल्पांची संकल्पना मांडण्यात आली आहे.
CSR निधीच्या माध्यमातून स्थानिक गरजा ओळखून त्यावर आधारित प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात येत आहे. ग्रामीण व वंचित भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रात ग्रामीण व जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती, नवीन वर्गखोल्या, डिजिटल क्लासरूम, स्मार्ट बोर्ड, संगणक, ई-लायब्ररी, विज्ञान व गणित प्रयोगशाळा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती तसेच NEET, JEE, MPSC, UPSC व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन अशा उपक्रमांचा समावेश आहे.
आरोग्य क्षेत्रात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, ग्रामीण आरोग्य शिबिरे, मोबाइल मेडिकल व्हॅन, महिला व बाल आरोग्य तपासणी, ज्येष्ठ नागरिक तपासणी, नेत्र व दंत तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्त तपासणी, मधुमेह व रक्तदाब तपासणी, कर्करोग तपासणी, पोषण कार्यक्रम, औषध वितरण, आरोग्य जागृती आणि आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
महिला सक्षमीकरणासाठी शिवणकाम, सौंदर्य व आरोग्यविषयक प्रशिक्षण, अन्नप्रक्रिया, मसाला उद्योग, पापड-लोणची, दूध प्रक्रिया, शेतीपूरक व्यवसाय, बचत गट, महिला उद्योजकता, डिजिटल व आर्थिक साक्षरता, FPO संबंधित क्षमता विकास, मार्केटिंग व ब्रँडिंग प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, Agroforestry, जलसंधारण, बंधारे, शेततळी, पाणलोट विकास, Rainwater Harvesting, भूजल पुनर्भरण, तलाव व नाले पुनरुज्जीवन, सौरऊर्जा, सौर पथदिवे, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त गाव, जैवविविधता संवर्धन आणि शाश्वत शेतीशी संबंधित उपक्रम राबविण्याची संकल्पना आहे.
ग्रामीण विकासासाठी पाणी, शेती, मूलभूत सुविधा आणि उपजीविका या चार प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शेतकरी प्रशिक्षण, कृषी उपकरणे, आधुनिक शेती तंत्रज्ञान, मृद परीक्षण, सेंद्रिय व शाश्वत शेती, पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, अन्नप्रक्रिया, युवक कौशल्य विकास आणि ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे नियोजन आहे.
झोपडपट्टी विकासासाठी सुरक्षित पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, आरोग्य शिबिरे, बालशिक्षण, डिजिटल शिक्षण, महिला व युवक कौशल्य विकास, रोजगार प्रशिक्षण, समुदाय केंद्र, वाचनालय, बालविकास केंद्र, पोषण कार्यक्रम, सौर प्रकाश व्यवस्था, उपजीविका सहाय्य आणि दिव्यांगांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
तसेच क्रीडा क्षेत्रात ग्रामीण क्रीडांगणे, विविध खेळांची मैदाने, जिम व ओपन जिम, क्रीडा साहित्य, प्रशिक्षक, मुलींसाठी विशेष प्रशिक्षण, दिव्यांगांसाठी क्रीडा सुविधा, क्रीडा स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आणि प्रतिभावान खेळाडूंना शैक्षणिक व क्रीडा सहाय्य देण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी ऐतिहासिक वास्तू, किल्ले व गड परिसर, लोककला, भारूड, कीर्तन, पोवाडा, पारंपरिक हस्तकला, कलाकार प्रशिक्षण, सांस्कृतिक महोत्सव, ग्रामीण सांस्कृतिक केंद्र, सार्वजनिक वाचनालय, डिजिटल लायब्ररी, संग्रहालय आणि हस्तकला विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.
माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपजीविका सहाय्य, युद्धविधवांच्या मुलांना शिक्षण सहाय्य, कौशल्य व रोजगार प्रशिक्षण, दिव्यांग माजी सैनिकांना सहाय्यक उपकरणे, Veterans Welfare Centres, समुपदेशन, शिष्यवृत्ती आणि आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबीयांसाठी livelihood projects राबविण्याची संकल्पना आहे.
महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. युवराज रामचंद्र येडूरे यांनी CSR निधीचा वापर स्थानिक गरजा, प्राधान्यक्रम आणि मोजता येणाऱ्या सामाजिक परिणामांशी जोडण्याची आवश्यकता व्यक्त केली. विविध क्षेत्रांतील प्रकल्पांसाठी स्वयंसेवी संस्था, स्थानिक प्रशासन, CSR कंपन्या आणि संबंधित घटकांनी समन्वयाने काम केल्यास ग्रामीण व वंचित भागातील विकासाला अधिक व्यापक स्वरूप मिळू शकते, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.
CSR निधीतून विकासाला नवी दिशा; शिक्षणापासून रोजगारापर्यंत १० क्षेत्रांत परिवर्तनाचा संकल्प
|