राजकीय

🗳️ अखेर पन्हाळा नगरपरिषदेची चार वर्षांची प्रतीक्षा संपली! महिलांच्या नेतृत्वाला नवी संधी

A new opportunity for women's leadership


By nisha patil - 7/10/2025 12:11:56 PM
Share This News:



पन्हाळा:- पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या निवडणुकीची चार वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. यंदाच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठरल्याने गडावरील राजकीय वातावरण तापले आहे. या आरक्षणामुळे महिला नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी मिळाली असून, मागील कार्यकाळाप्रमाणेच महिलांचे वर्चस्व कायम राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

नगराध्यक्षा आणि दहा महिला नगरसेविका मिळून एकूण अकरा महिला नगरपरिषदेवर नेतृत्वाची सूत्रे सांभाळणार आहेत.

⚔️ जनसुराज्य पक्ष विरुद्ध स्थानिक आघाडी — रंगणार थेट सामना

यंदाच्या निवडणुकीत जनसुराज्य पक्ष आणि स्थानिक आघाडी असा थेट सामना होण्याची शक्यता आहे.
जनसुराज्य पक्षाकडून अनेक दिग्गज महिला इच्छुकांच्या नावांची चर्चा सुरू असून त्यात 
    •    माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल
    •    माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या पत्नी रेखा पाटील
    •    माजी नगराध्यक्ष प्रभाकर भोसले यांच्या पत्नी शकुंतला भोसले
    •    भाजप नेते अमरसिंह भोसले यांच्या पत्नी व माजी नगरसेविका माधवी भोसले
    •    माजी नगराध्यक्षा दीपा काशीद
    •    माजी नगरसेविका सुरेखा गोसावी किंवा रेखा गोसावी
    •    तसेच रुकसाना मुजावर

या सर्व नावांमध्ये तिकिटासाठी चुरस वाढली आहे.

🏛️ स्थानिक आघाडीची तयारीही जोरात

स्थानिक आघाडीकडूनही महिला उमेदवारांच्या चर्चेला वेग आला आहे.
माजी नगराध्यक्षा वीणा बांदिवडेकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब मोकाशी यांच्या पत्नी रझिया मोकाशी, तसेच सतीश भोसले यांच्या पत्नी वेदांतिका भोसले ही नावे सध्या चर्चेत आहेत.

🧩 राजकीय समीकरणांवर लक्ष

बुधवारी नगरसेवक आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत.
दरम्यान, जनसुराज्य पक्षात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने आ. विनय कोरे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या निर्णयावरच अनेकांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.


🗳️ अखेर पन्हाळा नगरपरिषदेची चार वर्षांची प्रतीक्षा संपली! महिलांच्या नेतृत्वाला नवी संधी
Total Views: 30