बातम्या
IMA च्या इतिहासात आजऱ्याचा नवा विक्रम; अध्यक्ष-सचिवांना एकाच वेळी पुरस्कार!
By nisha patil - 11/14/2026 2:26:15 PM
Share This News:
IMA च्या इतिहासात आजऱ्याचा नवा विक्रम; अध्यक्ष-सचिवांना एकाच वेळी पुरस्कार!
प्रतिनिधी हसन तकीलदार महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इतिहासात आजरा शाखेने मानाचा नवा विक्रम नोंदवला आहे. नागपूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र IMA च्या २०२६ च्या 'मास्टॅकॉन' (Mastacon) या राज्यस्तरीय अधिवेशनात आजरा शाखेचे प्रेसिडेंट डॉ. दीपक सातोसकर आणि सेक्रेटरी डॉ. अनिल देशपांडे यांना एकाचवेळी राज्यस्तरीय 'प्रेसिडेंट अॅप्रिसिएशन अवॉर्ड' देऊन गौरविण्यात आले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल या दोन्ही पदाधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्यातील ज्या शाखेच्या प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी या दोघांनाही एकाचवेळी हा सन्मान मिळाला, अशी आजरा ही एकमेव शाखा ठरली आहे. या दुहेरी सन्मानामुळे आजरा शाखेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. दीपक सातोसकर आणि डॉ. अनिल देशपांडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
IMA च्या इतिहासात आजऱ्याचा नवा विक्रम; अध्यक्ष-सचिवांना एकाच वेळी पुरस्कार!
|