बातम्या
आजऱ्यात भटक्या कुत्र्यांचा थैमान, एक शेळी ठार तर एक जखमी
By nisha patil - 12/15/2025 3:49:19 PM
Share This News:
आजऱ्यात भटक्या कुत्र्यांचा थैमान, एक शेळी ठार तर एक जखमी
आजरा(हसन तकीलदार):-आजरा शहरात भटक्या कुत्र्यांचा दिवसेंदिवस हैदोस वाढतच आहे. शाळकरी मुलांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार याअगोदर घडले आहेत आणि आता भारत नगर येथे घरासमोर चरणाऱ्या रहुफ नसरदी यांच्या शेळ्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून एका शेळीला ठार मारले तर एक शेळी गंभीर जखमी झाली आहे.
आजरा शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढत्या त्रासामुळे याअगोदरही अनेक संघटनानी आणि पक्षांनी निवेदने देत आंदोलने केली आहेत. पाच -दहा कुत्री पकडण्याचे फार्स करून वेळ मारून नेण्याचे काम प्रशासनाने केले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कुत्र्यांचे कळपच्या कळप गेलोगल्लीत फिरताना दिसत आहेत. शाळेला जाणाऱ्या लहान मुलांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार याअगोदर घडले आहेत.
याबाबत नगरपंचायतीला निवेदनेही देण्यात आली आहेत. भारत नगरमधील रहुफ नसरदी यांच्या पाच -सहा शेळ्या घरासमोरील जागेत चरत असताना भटक्या कुत्र्यांनी शेळ्यावर हल्ला करून एक शेळी ठार केली तर दुसरी जखमी केली आहे. डॉक्टरनी जखमी शेळीला उपचार करून इंजेक्शन्स दिले असल्याचे सांगण्यात आले आहे. नगरपंचायतीने याची दखल घेऊन प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी तसेच काहीतरी विपरीत घडण्याअगोदर या भटक्या कुत्र्यांच्यावर कायमस्वरूपी उपाय करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मकसूद मुसा माणगावकर यांनी केली आहे.
आजऱ्यात भटक्या कुत्र्यांचा थैमान, एक शेळी ठार तर एक जखमी
|