बातम्या

 “मसाई देवीच्या चरणी साकडे, आणि दुसऱ्याच दिवशी पावसाची हजेरी!”

A plea offered at the feet of Goddess Masai


By nisha patil - 10/18/2026 12:26:23 PM
Share This News:



 “मसाई देवीच्या चरणी साकडे, आणि दुसऱ्याच दिवशी पावसाची हजेरी!”

पन्हाळ्याजवळील मसाई पठारावर मसाई देवीला केलेला नवस फळाला? नवसानंतर दुसऱ्याच दिवशी पावसाची हजेरी!
 

पन्हाळा प्रतिनिधी सौरभ कासे : पन्हाळ्याजवळील प्रसिद्ध मसाई पठारावरील मसाई देवीच्या भक्तिभावाची चर्चा सध्या परिसरात रंगू लागली आहे. काल भाविकांनी मसाई देवीला “पाऊस पडू दे, आई ” अशी आर्त विनवणी करत नवस केला होता. त्यानंतर आज परिसरात पावसाने हजेरी लावल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

पावसासाठी देवीला साकडे घातल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाऊस पडल्याने अनेक भाविकांनी याला देवीचा आशीर्वाद मानले आहे. या घटनेमुळे मसाई देवीवरील भाविकांची श्रद्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
 

मसाई पठार आणि परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेची चर्चा सुरू असून, पावसाच्या आगमनाने सर्वांनाच दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
 

 


 “मसाई देवीच्या चरणी साकडे, आणि दुसऱ्याच दिवशी पावसाची हजेरी!”
Total Views: 16