बातम्या
*बेळगाव जिल्ह्यातील मरणहोळ गावातून उठला हुकूमशाही विरोधात बुलंद आवाज !
By nisha patil - 9/11/2026 2:23:50 PM
Share This News:
*बेळगाव जिल्ह्यातील मरणहोळ गावातून उठला हुकूमशाही विरोधात बुलंद आवाज !
*आजरा(हसन तकीलदार):- बेळगाव जिल्ह्यातील मरणहोळ हे छोटंसं गाव.पण आज त्या छोट्याशा गावातून इतका मोठा आवाज उठला की, तो आवाज गोकुळपर्यंतच नाही तर संपूर्ण सीमा भागात घुमला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळमध्ये महायुतीकडून लोकशाहीची पायमल्ली करून जो हुकूमशाही पद्धतीचा कारभार चालू आहे, सर्वसामान्य शेतकरी, दूध उत्पादक, कामगार आणि गोकुळवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ज्या पद्धतीने डावललं जातंय, त्याबद्दल आज मरणहोळ येथील नागरिकांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली.
गावातील वडीलधारी मंडळी, तरुण, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येत सतेज उर्फ बंटी पाटील यांना भेटून, दि. ९ तारखेला होणाऱ्या भव्य मोर्चाला जाहीर आणि ठाम पाठिंबा दिला.
यावेळी गावकऱ्यांनी एकमुखाने सांगितलंकी,साहेब, तुम्ही पुढे चला, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. सीमा भागातील सर्व नागरिक तुमच्या सोबत आहेत, हा लढा तुम्ह एकट्याचा लढा नाही तर सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आणि लोकशाही प्रेमिंचा आहे.
खरं तर हा लढा कुणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. हा लढा गोकुळच्या हक्कासाठी आहे, शेतकऱ्यांच्या घामाच्या दामासाठी आहे, सर्वसामान्य माणसाचा आहे. असे म्हटले आहे.
*बेळगाव जिल्ह्यातील मरणहोळ गावातून उठला हुकूमशाही विरोधात बुलंद आवाज !
|