बातम्या

*आजरा शहरात गणेश विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त करण्याचा गणेश मंडळांचा स्तुत्य व आदर्शवत निर्णय 

A praiseworthy and exemplary decision by the Ganesh


By nisha patil - 9/22/2026 7:57:26 PM
Share This News:



*आजरा शहरात गणेश विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त करण्याचा गणेश मंडळांचा स्तुत्य व आदर्शवत निर्णय 

*पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्धार

*आजरा(हसन तकीलदार):-गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि ध्वनीप्रदूषणमुक्त पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला आजरा शहरातील गणेश मंडळांनी अतिशय सकारात्मक व उल्लेखनीय प्रतिसाद दिला आहे. सर्व मंडळानी आदर्शवत आणि अनुकरणीय निर्णय घेतला आहे.आजरा पोलीस ठाण्यात पार पडलेल्या बैठकीत शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आजरा शहर पूर्णपणे 'डॉल्बीमुक्त' ठेवून पारंपरिक वाद्यांच्या गजरात  गणरायाचे विसर्जन करण्याचा एकमुखी व स्तुत्य निर्णय जाहीर केला आहे.

कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक  अण्णासाहेब जाधव, गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील आणि आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी यंदाचा गणेशोत्सव शांततेमध्ये, सुरळीत, विधायक उपक्रमांनी व ध्वनीप्रदूषण विरहीत साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आजरा पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या उपस्थितीत प्रमुख मंडळांची बैठक झाली. या बैठकीत दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त ठेवून पारंपरिक वाद्यांच्या गजरात वेळेत काढून वेळेत समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पोलीस प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे हमीपत्र देण्यात आले.

यावेळी 
श्री सार्वजनिक गणेश मंडळ, आजरा, जय शिवराय मंडळ, आजरा,भाजी मार्केट व्यापारी मंडळ, आजरा,सुभाष चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आजरा,लिंगायत गल्ली सार्वजनिक गणेश मंडळ, आजरा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी यांनी आपल्या निर्णयाचे लेखी हमीपत्र दिले.

गणेश मंडळांनी घेतलेल्या या पर्यावरणपूरक निर्णयाचे शहर व परिसरातून उत्स्फूर्त स्वागत तसेच कौतुक होत आहे. डॉल्बीमुक्त व ध्वनीप्रदूषण विरहीत उत्सवाचा हा आदर्श इतर मंडळांनाही प्रेरणा देणारा ठरेल, मंडळांच्या या सहकार्याबद्दल पोलीस प्रशासनाने विशेष आभार व्यक्त केले आहेत.


*आजरा शहरात गणेश विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त करण्याचा गणेश मंडळांचा स्तुत्य व आदर्शवत निर्णय 
Total Views: 217