विशेष बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील निवृत्त शिक्षकाचा माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात हृदयविकाराने दु:खद निधन

A retired teacher from Shirol taluka in Kolhapur

By nisha patil - 1/6/2025 12:58:49 AM
Share This News:

कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील निवृत्त शिक्षकाचा माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात हृदयविकाराने दु:खद निधन

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथे माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात दु:खद घटना घडली आहे. निवृत्त शिक्षक विनायक सखाराम कुंभार (वय 78) यांनी गाणे गात असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला.

उदगाव येथील 2001-2002 या दहावीच्या बॅचने आयोजित केलेल्या या स्नेह मेळाव्यामध्ये शंभरहून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिक्षक कुंभार सरांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रम सुरू असताना सर भाषण करत असताना आनंदी गाणं 'इकडे तिकडे चोहीकडे' म्हणायला सुरुवात केली. अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका बसला आणि ते व्यासपीठावरच कोसळले.

विद्यार्थ्यांनी त्वरित त्यांना उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधीच त्यांच्या प्राणांचा निरोप झाला. या घटनेने कार्यक्रमात उपस्थित सर्वांना मोठा धक्का बसला आणि कार्यक्रमात शोककळा पसरली.

शिरोळ तालुका आणि जयसिंगपूर परिसरातील नागरिक या दु:खद घटनेने शोकाकूल झाले आहेत. निवृत्त शिक्षक कुंभार सरांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य गावात नेहमी स्मरणात राहील.

कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील निवृत्त शिक्षकाचा माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात हृदयविकाराने दु:खद निधन
Total Views: 125