बातम्या

रविकिरण इंगवले यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांचा जनसागर; शुभेच्छांचा वर्षाव

A sea of ​​activists gather after Ravikiran Ingavales election shower of congratulations


By Administrator - 6/27/2025 4:20:30 PM
Share This News:



रविकिरण इंगवले यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांचा जनसागर; शुभेच्छांचा वर्षाव

“मरगळ झटकून नव्या जोमात मैदानात उतरा” – इंगवले यांचे कार्यकर्त्यांना स्फूर्तिदायी आवाहन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेतेपदातील ओळख निर्माण केलेले रविकिरण इंगवले यांची नुकतीच  जिल्हाध्यक्षपदी  नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीने संपूर्ण कोल्हापुरात उत्साहाचे वातावरण असून पक्षकार्याला नवी दिशा मिळण्याची चिन्हं आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना इंगवले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शिवसेनेत आलेली मरगळ आता झटकून टाकूया, नव्या जोमात कार्याला लागा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा.” त्यांच्या या ठाम भूमिकेने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

नियुक्तीनंतर इंगवले यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. शुभेच्छा देण्यासाठी शहर व जिल्ह्यातील विविध भागांतून कार्यकर्ते दाखल होत होते, आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत एकजुटीने पक्षबळ वाढवण्याचा निर्धार केला जात आहे


रविकिरण इंगवले यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांचा जनसागर; शुभेच्छांचा वर्षाव
Total Views: 77