बातम्या
दिंडनिर्लीत सातवीतल्या विद्यार्थ्याचा पोहताना मृत्यू; गावात शोककळा
By Administrator - 11/4/2025 4:10:28 PM
Share This News:
दिंडनिर्लीत सातवीतल्या विद्यार्थ्याचा पोहताना मृत्यू; गावात शोककळा
दिंडनेरली (ता. करवीर) येथील वाण्याचे शेत परिसरातील विहिरीत पोहताना दम लागून एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयुष अनिल शेटे (वय 13) असं या मुलाचं नाव असून, तो ईश्वरा वाडकर हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत होता.
ही घटना गुरुवारी (दि. १० एप्रिल) दुपारी घडली. आयुष हा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत चुलत्याच्या विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना त्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे त्याला दम लागला. कसातरी काठावर येऊन तो उलट्या करून तिथेच कोसळला. मित्रांनी त्याच्या पोटातील पाणी काढून कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. त्याला तात्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आलं, मात्र त्यांनी मृत घोषित केलं.
या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. आयुष शांत आणि सुरक्षित मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या अकाली निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण, आजी, चुलते, चुलती आणि चुलत भावंडे असा परिवार आहे. त्यांच्या आक्रोशाने वातावरण हृदयद्रावक झाले आहे.
गावकरी आणि शिक्षक वर्गानेही या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त करत कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.
दिंडनिर्लीत सातवीतल्या विद्यार्थ्याचा पोहताना मृत्यू; गावात शोककळा
|