राजकीय
कागलमध्ये जंगी शक्तिप्रदर्शन — मुश्रीफ–घाटगे एकाच मंचावर; विरोधकांना करारा शह!
By nisha patil - 11/29/2025 2:08:40 PM
Share This News:
कागलच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये उमेदवार प्रकाश गाडेकर व संगीता रजपूत यांच्या प्रचारार्थ मंत्री हसन मुश्रीफ आणि राजे समरजीत घाटगे एकत्र येताच राजकीय वातावरण अक्षरशः पेटलं. अनेक वर्षांनी पाहायला मिळालेलं हे दुर्मिळ एकत्रीकरण झाल्यावर कागलकरांनी सभेला प्रचंड प्रतिसाद देत मैदान खचाखच भरून टाकलं.
सभेतून दिलेलं संयुक्त आवाहन अत्यंत दमदार
“कागलच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत… एकदिलाने मतदान करा!”
या जंगी सभेने विरोधकांची चूल-बंद करणारा स्पष्ट संदेश दिला आहे की कागलमध्ये युतीची लाट प्रचंड वेगाने उसळली असून प्रभाग 3 मध्ये लढत अधिक रंगतदार झाली आहे
कागलमध्ये जंगी शक्तिप्रदर्शन — मुश्रीफ–घाटगे एकाच मंचावर; विरोधकांना करारा शह!
|