बातम्या
सभापती निवासस्थानात घोणसाचा थरार; सर्पमित्रांनी पकडला विषारी साप!
By nisha patil - 9/21/2026 4:39:55 PM
Share This News:
सभापती निवासस्थानात घोणसाचा थरार; सर्पमित्रांनी पकडला विषारी साप!
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या सभापती निवासस्थान परिसरात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घोणस जातीचा अत्यंत विषारी साप आढळून आल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सर्पमित्र स्वप्निल ढवण तसेच विश्वजित पाटील, महेश जाधव आणि प्रदीप लोढे यांनी अथक प्रयत्न करत या विषारी सापाला सुरक्षितपणे पकडले.
सर्पमित्र स्वप्निल ढवण हे पंचायत समिती करवीर येथे BM/तालुका व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सापाला कोणतीही इजा न करता पकडून जिल्हा परिषद सभापती निवासस्थानातील सुरक्षा रक्षकांच्या स्वाधीन केले.
यावेळी सर्पमित्रांनी उपस्थित नागरिकांना घोणस सापाची ओळख, त्याचे विषारी स्वरूप, त्यापासून घ्यावयाची काळजी आणि साप आढळल्यास कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती दिली. सापाला सुरक्षितपणे पकडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सभापती निवासस्थानात घोणसाचा थरार; सर्पमित्रांनी पकडला विषारी साप!
|