ताज्या बातम्या

सावित्रीबाई फुले : समता आणि शिक्षणाची मशाल

A torchbearer of equality and education


By nisha patil - 3/1/2026 1:18:47 PM
Share This News:



सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि क्रांतिकारक म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी १८४८ साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

त्या काळात स्त्रीशिक्षणाला तीव्र विरोध असतानाही सावित्रीबाई फुले यांनी मुली, दलित आणि वंचित समाजघटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. सामाजिक विरोध, अपमान आणि अन्याय सहन करत त्यांनी शिक्षण व समाजसुधारणेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले.

विधवा पुनर्वसन, बालहत्या प्रतिबंध, जातिभेद निर्मूलन आणि स्त्रीहक्क यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून समाजासमोर मांडला.

सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून, शिक्षण, समता आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक करण्याचा मार्ग दाखवतात.  तारा न्यूज तर्फे सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन


सावित्रीबाई फुले : समता आणि शिक्षणाची मशाल
Total Views: 18