बातम्या

मधुरिमा राजेंच्या वाढदिवशी माणुसकीचा घास! अनिकेत घोटणे यांचा स्तुत्य उपक्रम

A touch of humanity on Madhurima Rajes


By nisha patil - 11/25/2026 3:47:14 PM
Share This News:



मधुरिमा राजेंच्या वाढदिवशी माणुसकीचा घास! अनिकेत घोटणे यांचा स्तुत्य उपक्रम

 छत्रपती मधुरिमा राजे यांच्या वाढदिवसानिमित्त अनिकेत घोटणे यांच्या पुढाकाराने कोल्हापुरातील 'कोल्हापूर थाळी' येथे गरजू बांधवांसाठी अन्नवाटपाचा विशेष उपक्रम राबविण्यात आला.

वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत गरजू आणि वंचित घटकांना अन्नदान करण्यात आले. आनंदाचा क्षण केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान फुलवण्यासाठी वापरण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

अनिकेत घोटणे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केल्याची भावना व्यक्त होत आहे.


मधुरिमा राजेंच्या वाढदिवशी माणुसकीचा घास! अनिकेत घोटणे यांचा स्तुत्य उपक्रम
Total Views: 13