बातम्या
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रंथपालन व्यवसायाचे भविष्य या विषयावर शिवाजी विद्यापीठात शुक्रवारपासून दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
By Administrator - 5/3/2026 1:09:46 PM
Share This News:
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रंथपालन व्यवसायाचे भविष्य या विषयावर शिवाजी विद्यापीठात शुक्रवारपासून दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सिनेट हॉलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रंथपालन व्यवसायाचे भविष्य या विषयावर शुक्रवारपासून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरु प्रोफेसर डॉ. ज्योती जाधव, मुकला संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे, उच्च शिक्षण कोल्हापूर विभागाचे सहसंचालक डॉ.प्रकाश बच्छाव यांचे शुभ हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. मुकलाचे सचिव डॉ. विनय पाटील उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आहेत.
इन व्हिजिनिंग लायब्ररीयनशिप इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स येरा अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रंथपालन व्यवसायाचे भविष्य या विषयावर दोन दिवशीय परिषदेत विविध वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत सेवानिवृत्त ग्रंथपालांचाही सत्कार होणार आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज लायब्ररी असोसिएशन, मुकला शिवाजी युनिव्हर्सिटी सेक्शनल कौन्सिल व बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर नॉलेज रिसोर्स सेंटर आणि डिपार्टमेंट ऑफ लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स शिवाजी युनिव्हर्सिटी यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्राचे प्र.संचालक डॉ. डी.बी.सुतार, ग्रंथालय माहितीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. बी. पाटील ,उपग्रंथपाल डॉ. पी.बी.बिलावर व सह समन्वयक प्रा. एच.बी.पवार यांनी केले आहे.
या परिषदेतील उद्घाटन कार्यक्रमात ग्रंथपाल संशोधक अभ्यासक यांनी लिहिलेल्या संशोधन पेपरच्या प्रोसिडिंगचे प्रकाशन होणार आहे. तसेच मुकला संघटनेच्या वार्षिक अहवालाचे वाचन होणार आहे. ग्रंथपालन व्यवसाय व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाच्या अनुषंगाने संशोधक संशोधन पेपरही सादर करणार आहेत .
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रंथपालन व्यवसायाचे भविष्य या विषयावर शिवाजी विद्यापीठात शुक्रवारपासून दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
|