बातम्या

रहस्य, संशय आणि थराराचा अनोखा संगम; ‘मिरांडा वॉर्निंग’ चित्रपट २७ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला!

A unique blend of mystery


By nisha patil - 11/18/2026 12:02:59 AM
Share This News:



रहस्य, संशय आणि थराराचा अनोखा संगम; ‘मिरांडा वॉर्निंग’ चित्रपट २७ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला!

आदिनाथ कोठारे आणि जान्हवी किल्लेकर यांच्या प्रमुख भूमिका; ट्रेलर प्रदर्शित होताच चित्रपटाची उत्सुकता वाढली

कोल्हापूर प्रतिनिधी : अजित बोडके प्रत्येक चेहऱ्यामागे दडलेले एक नवे रहस्य, प्रत्येक व्यक्तीवर संशय आणि प्रत्येक वळणावर अनपेक्षित धक्के… अशा उत्कंठावर्धक कथानकाचा अनुभव देणारा ‘मिरांडा वॉर्निंग’ हा नवा मराठी चित्रपट येत्या २७ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्सुकता व्यक्त होत आहे.

‘इथला प्रत्येक चेहरा एक नवीन रहस्य लपवून बसलाय... कोणाचा अंदाज खरा ठरणार आणि कोण कोणाला चकवा देणार?’ या संवादातून चित्रपटातील रहस्य, संशय आणि थराराची झलक पाहायला मिळते.

या चित्रपटात आदिनाथ कोठारे आणि जान्हवी किल्लेकर प्रमुख भूमिकेत दिसणार असून, सचिन धोत्रे यांच्यासह अन्य कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. रहस्यमय कथानक, संशयाचे धागेदोरे आणि अनपेक्षित वळणे यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन धोत्रे यांनी केले असून, कथा व लेखनाची जबाबदारी रविंद्र मठाधिकारी आणि सयली मठाधिकारी यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची निर्मिती सचिन धोत्रे, एम. बी. अल्लिकट्टी आणि नागेश धोत्रे यांनी केली आहे.

अल्ट्रा जकासचे सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्र यांच्या वतीने हा चित्रपट सादर करण्यात येत आहे. सटनम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मूव्हीज या निर्मिती संस्थांचा चित्रपटाच्या निर्मितीत सहभाग आहे. तर सनशाईन स्टुडिओजकडून चित्रपटाचे वितरण करण्यात येणार आहे.

रहस्यांची उकल, संशयाचे वातावरण आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे कथानक अशी वैशिष्ट्ये असलेला ‘मिरांडा वॉर्निंग’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपटप्रेमींना या थरारपटाची प्रतीक्षा लागली आहे.


रहस्य, संशय आणि थराराचा अनोखा संगम; ‘मिरांडा वॉर्निंग’ चित्रपट २७ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला!
Total Views: 4