ताज्या बातम्या

पंचगंगा स्मशानभूमीत शेणीदानाचा अनोखा उपक्रम; वर्षा नगर मित्र मंडळाने दाखवली सामाजिक एकतेची ताकद!

A unique initiative of cow dung donation at Panchganga Crematorium


By nisha patil - 11/24/2025 11:01:21 AM
Share This News:



कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यविधी प्रक्रियेत आवश्यक असलेल्या शेणीचा तुटवडा जाणवत असल्याची बाब लक्षात येताच, वर्षा नगर मित्र मंडळाच्या तरुणांनी समाजहितासाठी पुढाकार घेत खऱ्या अर्थाने सेवाभावाचे उदाहरण दाखवले.

वर्षा नगर परिसरातील तरुण, महिला, जेष्ठ नागरिक आणि समाजहिताचा ध्यास घेणाऱ्या नागरिकांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेणी संकलित केली. आज हे संकलित शेणीदान पंचगंगा स्मशानभूमीत देऊन एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न सोडवण्यात आला.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे—कोणत्याही आवाहनाची वाट न पाहता नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पुढे येत दाखवलेली एकजूट. “समाजासाठी – समाजच पुढे येऊ या” या भावनेतून उभी राहिलेली ही एकात्मता उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली.

वर्षा नगर मित्र मंडळाने पुढील काळातही समाजहिताचे उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करत, सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे.

हा उपक्रम केवळ शेणीदानापुरता मर्यादित नसून—संकटाच्या काळात एकत्र येण्याची, समाजासाठी उभे राहण्याची कोल्हापुरकरांची ताकद पुन्हा एकदा दाखवून देणारा ठरला आहे.


पंचगंगा स्मशानभूमीत शेणीदानाचा अनोखा उपक्रम; वर्षा नगर मित्र मंडळाने दाखवली सामाजिक एकतेची ताकद!
Total Views: 42