विशेष बातम्या
आजऱ्यात भरवस्तीत गवा रेड्याचे दर्शन
By Administrator - 9/3/2026 3:22:35 PM
Share This News:
आजऱ्यात भरवस्तीत गवा रेड्याचे दर्शन
आजरा (हसन तकीलदार):-आजरा तालुक्यात दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचे गाव वस्तीत दर्शन नित्याचेच झाले आहे. सिरसंगीत हत्ती, वजरेत वाघ आणि आता आजऱ्याच्या दावल मलिक येथे भर वस्तीत रात्री 8:00वाजता गव्याचे दर्शन झाले.
भाई भाई थिएटरच्या मागच्या बाजूस दावल मलिक दर्गा आहे. याठिकाणी भरवस्तीत रात्री 8:00 वाजता गवा रेडा आल्याची बातमी कळताच युवक,मुले थेट दावल मलिकावर दाखल झाले. काही उत्साही तरुण गवा रेड्याला हुसकावण्याचा प्रयत्न करीत होते तर काहीजण मोबाईल मध्ये चीत्रीकरण करीत होते. लोकांच्या गोंधळामुळे गवा बिथरल्यासारखा वाटत होता.
भर वस्तीत गवा आल्यामुळे लोकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती.त्यानंतर तो गवा शेतवडीतून आय. टी. आय कॉलेजच्या टेकडीवरून साळगाव जंगलाकडे गेल्याचे बोलले जात आहे. पुन्हा एकदा वन्य प्राण्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आजऱ्यात भरवस्तीत गवा रेड्याचे दर्शन
|