विशेष बातम्या
आठवड्याभर आधीच दीपावलीच्या खरेदीसह अंबाबाई मंदिरात भाविकांची संपूर्ण गर्दी
By Administrator - 10/13/2025 4:57:58 PM
Share This News:
आठवड्याभर आधीच दीपावलीच्या खरेदीसह अंबाबाई मंदिरात भाविकांची संपूर्ण गर्दी
कोल्हापूर – अवघ्या आठ दिवसांवर दीपावली येऊन ठेपली असून, खरेदीचा माहोल शहरभर फुलला आहे. शासकीय सुट्टीचा फायदा घेत हजारो करवीरकर बाजारपेठेत खरेदीसाठी हजर झाले आहेत, तर अनेक जण खरेदी करत करत अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी जाताना दिसले.
स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांच्या गर्दीने अंबाबाई मंदिर परिसर गजबजून गेला आहे. गेल्या शनिवारी व रविवारी सब्बा लाखावर भाविकांनी मंदिरात दर्शन घेतल्याची माहिती सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाकडे नोंद झाली आहे.
दहा दिवसांपासून पावसाने उघडी दिल्याने शुक्रवारच्या रात्रीच हजारो भाविक शहरात पोहोचले होते. रात्री अकरानंतर मंदिर परिसर व यात्रीनिवास भाविकांनी भरून गेला. रविवारीही सकाळी १० नंतर मोठ्या संख्येने भाविकांचे आगमन सुरू झाले, चारचाकी वाहनांनी बिंदू चौक, दसरा चौकासह इतर वाहनतळ भरले.
भाविकांच्या वर्दळीमुळे मंदिर परिसर सतत गजबजलेला राहिला. अनेकांनी रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत वाडीरत्नागिरीवरील जोतिबाचे दर्शन घेत, किल्ले पन्हाळगडालाही भेट दिली
आठवड्याभर आधीच दीपावलीच्या खरेदीसह अंबाबाई मंदिरात भाविकांची संपूर्ण गर्दी
|