बातम्या

*दुचाकीवरून खाली पडून पेंढारवाडी ता. आजरा येथील महिलेचा अपघाती मृत्यू

A woman from Pendharwadi Taluka Ajra died after falling off her bike


By nisha patil - 11/24/2026 6:18:02 PM
Share This News:



*दुचाकीवरून खाली पडून पेंढारवाडी ता. आजरा येथील महिलेचा अपघाती मृत्यू
 

*आजरा(हसन तकीलदार):-मोटरसायकलवर मागे बसून जात असताना पेंढारवाडी ता. आजरा येथील रेणुका अनिल चव्हाण (वय वर्षे 42)स्पीड ब्रेकरवरून मोटर सायकल घसरल्याने खाली पडून अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.रोहन अनिल चव्हाण (वय वर्षे 25 )रा. पेंढारवाडी ता. आजरा यांच्या फिर्यादीवरून आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
             

आजरा पोलीस स्टेशनकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. 22/11/2026 रोजी सकाळी 10:30 वाजता मोटरसायकल क्र. MH. 09.EQ. 8950 वरून मोटरसायकलच्या मागे बसून जात असताना पेंढारवाडी गावाच्या हद्दीत स्पीड ब्रेकरवरून मोटरसायकल घसरून मोटरसायकलवरून रेणुका चव्हाण खाली पडून गंभीर जखमी झाल्याने गडहिंग्लज येथे उपचाराला नेत असताना उपचारापूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. फिर्यादी यांचे जबाबावरून त्याचे आईच्या मृत्यूस मोटरसायकलस्वार कारणीभूत असल्याचे वर्दी जबाब दिलेने त्यानुसार गुन्हा नोंद करून घेणेत आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांचे मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. हजारे पुढील तपास करीत आहेत.


*दुचाकीवरून खाली पडून पेंढारवाडी ता. आजरा येथील महिलेचा अपघाती मृत्यू
Total Views: 219