बातम्या

भागीरथी संस्था आणि रोटरी क्लबच्या वतीने वाशी इथल्या शाळेत झाली आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा

A workshop on making sky lanterns was held at a school


By nisha patil - 11/10/2025 6:03:52 PM
Share This News:



भागीरथी संस्था आणि रोटरी क्लबच्या वतीने वाशी इथल्या शाळेत झाली आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा

भागीरथी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन यांच्यावतीने अनेक शाळांमध्ये आकाश कंदील निर्मिती कार्यशाळा घेतली जात आहे. त्यातून मुलांना नवनर्मितीचा आनंद मिळेल, तसेच प्लास्टिक मुक्त भारत घडवण्यासाठी प्रबोधन केले जात आहे, असे भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा  अरुंधती महाडिक यांनी नमुद केले. करवीर तालुक्यातील वाशी इथल्या प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या आकाश कंदील कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
 

दिवाळी प्लास्टिक मुक्त व्हावी, यासाठी भागीरथी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन यांच्यावतीने कागदापासून आकाश कंदील निर्मितीचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. करवीर तालुक्यातील वाशी इथल्या प्राथमिक शाळेमध्ये आकाश कंदील निर्मितीची कार्यशाळा झाली. सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते या कार्यशाळेचा शुभारंभ झाला. मुख्याध्यापक सुनील कारंजकर यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे नमुद केले. तर रोटरी क्लबचे अध्यक्ष केतन मेहता यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. वाशी ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष रानगे यांनी भागीरथी संस्थेच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले.

तर अशा प्रकारच्या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, मुलांना मिळणारा नवनिर्मितीचा आनंद अनमोल असतो, असे सौ. अरूंधती महाडिक यांनी नमुद केले. प्लास्टिक मुक्त भारत होण्यासाठी, विद्यार्थी दशेपासून मुलांना पर्यावरणाचे महत्व सांगणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक आणि आकर्षक आकाश कंदील बनवले. प्रशिक्षक म्हणून सुहास प्रभावळे यांनी काम पाहिले.

यावेळी सारिका रानगे, अरुण कांबळे, कृष्णात पाटील, संतोष रानगे, किशोर बठेजा, अशोक पाटील, तानाजी शेंडगे, गोरखनाथ पाटील, विकास राऊत, ऋषिकेश जाधव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


भागीरथी संस्था आणि रोटरी क्लबच्या वतीने वाशी इथल्या शाळेत झाली आकाश कंदील बनवण्याची कार्यशाळा
Total Views: 94