विशेष बातम्या
जवळच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.
By nisha patil - 5/17/2025 3:18:52 PM
Share This News:
जवळच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.
कोल्हापुरातील आर के नगर मध्ये राहणाऱ्या "आकाश शांताराम बोराडे" या २३ वर्षीय तरुणाने मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. त्याने राहत्या घराच्या बेडरूम मधील पंख्याला दोरीने गळफास घेतला. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस उघडकीस आल्याचं करवीर पोलिसांनी सांगितलं. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली.
तिथे आकाशने चार पाणी चिट्ठी लिहून ठेवल्याचं आढळून आलं. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून, पोलीस त्याच्या मित्राकडून त्याला नेमका काय त्रास होता, याचा शोध घेत आहेत.
मयत आकाश हा के आय टी कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत होता. त्याने नुकतीच अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. त्याचं कॅम्पस इंटरव्यू मधून एका मोबाईल मध्ये व्यवस्थापक म्हणून ही सिलेक्शन झालं होतं.
जवळच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या.
|