ताज्या बातम्या
अज्ञात वाहनाच्या धडकेत सोहळेवाडी येथील तरुणाचा मृत्यू
By nisha patil - 2/14/2026 3:31:25 PM
Share This News:
अज्ञात वाहनाच्या धडकेत सोहळेवाडी येथील तरुणाचा मृत्यू
आजरा (हसन तकीलदार) :- रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोहाळे पैकी सोहाळेवाडी (ता. आजरा) येथील प्रशांत उर्फ गोट्या नामदेव दोरूगडे (वय 38) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना माणगाव (जि. रायगड) जवळ शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, प्रशांत हा महाड येथे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. शुक्रवारी रात्री तो ट्रक घेऊन मुंबईहुन महाडकडे जात होता. या प्रवासादरम्यान माणगाव नजीक ट्रक रस्त्याशेजारी लावून रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने प्रशांत यांना ठोकरले. यात प्रशांत हा गंभीर जखमी होऊन मयत झाला. प्रशांत हा आईवडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याच्या आईचे सुमारे दहा वर्षांपूर्वी तर वडिलांचे तीस वर्षांपूर्वी निधन झाले होते. प्रशांतच्या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत सोहळेवाडी येथील तरुणाचा मृत्यू
|