बातम्या
पंच्याहत्तरी पार केलेला तरुण खेळतोय लाठीकाठी
By nisha patil - 11/22/2025 3:21:30 PM
Share This News:
पंच्याहत्तरी पार केलेला तरुण खेळतोय लाठीकाठी
आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा तालुक्यातील देवर्डे गावातील पंच्याहत्तरी पार केलेले एकनाथ भरमा तानवडे यांनी आपल्या नातवाच्या आग्रहस्तव लाठीकाठी खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
दसऱ्यामध्ये पालखीसमोर मर्दानी खेळ खेळले जातात. या मर्दानी खेळात तानवडेमामा लेझीम, दांडपट्टा अशा खेळांचे प्रात्यक्षिक करतात. शिमग्यामध्ये चौकामध्ये होळीच्या समोर ज्यावेळी कला सादर केली जाते. त्यावेळी अप्रतिम, सुमधुर बासरी वादन करून लोकांना मंत्रमुग्ध करण्याची कला आहे. आज पंच्याहत्तरी पुर्ण करुनसुद्धा शेतात राबून आपले आरोग्य अगदी ठणठणीत ठेवले आहे. परवा खळ्यावर भाताची मळणी काढताना खास नातवाच्या आग्रहास्तव तानवडेमामानी आपली कला दाखवत लाठीकाठी खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
आजही या वयात त्यांची स्फूर्ती आणि चपळाई भल्याभल्या तरुणाईला लाजवेल अशी आहे. डिजिटलच्या युगात आता निसर्गाकडे वळणे काळाची गरज बनली आहे. आरोग्य सांभाळायचे असेल तर व्यवसायिक दृष्टीकोन ठेऊन युवकांनी शेतीकडे वळले पाहिजे. आज तानवडेमामा हे युवकांना आदर्श आहेत.
पंच्याहत्तरी पार केलेला तरुण खेळतोय लाठीकाठी
|