बातम्या

वळिवडे येथे मोबाईलवर मटका घेणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

A young man who bought matka on his mobile phone


By nisha patil - 9/23/2025 12:34:21 PM
Share This News:



गांधीनगर -: करवीर तालुक्यातील वळिवडे (शांतीनगर परिसर) येथे मोबाईलवरून मटका घेत असताना पोलिसांनी छापा टाकून अविनाश नरेश परीट (वय 28, रा. विकास कॉलनी, उचगाव, ता. करवीर) याला ताब्यात घेतले. या प्रकरणात मटका मालक अजय ढेरे (रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली. अविनाश परीट हा अजय ढेरे याच्याकडे कमिशन एजंट म्हणून काम करत होता. तो लोकांकडून प्रत्यक्ष आणि मोबाईलवर जुगाराचे अंक (कल्याण मटका) घेत होता. पोलिसांच्या कारवाईदरम्यान परीट याच्याकडून 12 हजार 800 रुपये रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला. मात्र मटका मालक अजय ढेरे फरार झाला आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल अमित मर्दाने, दीपक घोरपडे, संजय हुंबे, प्रवीण पाटील आणि सत्यजित तानुगडे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनय झिंजुर्के व सहाय्यक फौजदार सचिन सावंत करत आहेत.


वळिवडे येथे मोबाईलवर मटका घेणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात
Total Views: 82