बातम्या
महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘आप’कडून अर्जवाटप उद्यापासून
By nisha patil - 12/17/2025 3:43:20 PM
Share This News:
महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘आप’कडून अर्जवाटप उद्यापासून
विकासासाठी काम करू इच्छिणाऱ्यांना ‘आप’चे खुले आमंत्रण
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम आदमी पार्टीने (AAP) ही निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वाटपाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
आप पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी १८ व १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर २० व २१ डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
शहराच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या आणि स्वच्छ, पारदर्शक राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी आप कार्यालय, उद्यमनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई व शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केले आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘आप’कडून अर्जवाटप उद्यापासून
|