बातम्या
विचारे माळ परिसरात उघड मटका व्यवसायाविरोधात "आप"चा इशारा!
By nisha patil - 4/17/2025 4:18:18 PM
Share This News:
विचारे माळ परिसरात उघड मटका व्यवसायाविरोधात "आप"चा इशारा!
आप आम आदमी पार्टीकडून मटका बुकीवर बंदीची जोरदार मागणी
सदरबाजार येथील विचारे माळ परिसरात उघडपणे सुरू असलेल्या मटका बुकी व्यवसायाविरोधात आप आम आदमी पार्टीने कडक भूमिका घेतली आहे. शहर संघटक विजय हेगडे यांच्या नेतृत्वाखाली शाहूपुरी पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली.
विचारे माळ भागात सामान्य व गरीब कुटुंबे वास्तव्यास असून, या परिसरात उघडपणे सुरू असलेला मटका व्यवसाय त्यांच्या आर्थिक अडचणी वाढवणारा व सामाजिक वातावरण बिघडवणारा ठरत आहे. तरी पोलिसांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्यास, स्थानिक नागरिकांना घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही विजय हेगडे यांनी दिला.
या निवेदनप्रसंगी आपचे सचिव समीर लतीफ, अमर हेगडे, उदय कांबळे, राहुल तलवारे, लखन मोहिते, गणेश बिरांचे, सचिन शेटे, प्रदीप टिकारे आणि भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मागणीमुळे स्थानिक प्रशासनासमोर त्वरित निर्णय घेण्याचे आव्हान निर्माण झाले असून, या प्रश्नावर काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
विचारे माळ परिसरात उघड मटका व्यवसायाविरोधात "आप"चा इशारा!
|