शैक्षणिक

शहाजी महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर सेमिनार संपन्न

AI Technologies and Toolkits


By nisha patil - 8/19/2025 4:26:02 PM
Share This News:



कोल्हापूर : शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर येथील बीसीए विभागाच्या वतीने "AI Technologies and Toolkits" या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनार मंगळवार, दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी वि. रा. शिंदे सभागृहात संपन्न झाला.

   कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या प्रार्थनेने झाली. स्वागत व परिचय बीसीए समन्वयक सौ. एस. एस. शेवडे यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक मा. शहाजी के. शिंदे (मयूर सॉफ्टवेअर्स, वाठार, कोल्हापूर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

   श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या सेमिनारला मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते.

     यावेळी रजिस्ट्रार श्री. आर. जे. भोसले, ऑफिस सुपरिंटेंडंट श्री. एम. व्ही. भोसले, आयक्यूएसी सह समन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. दीपक वळवी, वाणिज्य व व्यवस्थापन विभागप्रमुख श्री. संतोष एच. कांबळे, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. के. एम. देसाई व बीसीए समन्वयक सौ. एस. एस. शेवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या सेमिनारमध्ये तज्ज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व त्यातील विविध टूलकिट्स याविषयी सविस्तर व मार्गदर्शक माहिती दिली. शिक्षण, उद्योग व करिअरच्या संधींमध्ये एआयचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. 

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बीसीए विभागाच्या शिक्षकवृंदाने केले. प्रशासकीय सहकारी व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
शेवटी कु. स्वाती बी. पाटील यांनी आभार प्रदर्शन करून मान्यवरांचे तसेच सहभागींचे आभार मानले.

या मार्गदर्शनपर सेमिनारमुळे एआयच्या नव्या संधी व साधनांबाबत जागरूकता निर्माण झाली असून प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला, असे सर्व उपस्थितांचे एकमत होते.


शहाजी महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर सेमिनार संपन्न
Total Views: 148