शैक्षणिक
विवेकानंद मध्ये एड्स जनजागृती व्याख्यान संपन्न.
By nisha patil - 9/23/2025 3:19:17 PM
Share This News:
विवेकानंद मध्ये एड्स जनजागृती व्याख्यान संपन्न.
कोल्हापूर दि. 23 : महाराष्ट्र राज्य् एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई यांच्या वतीने विवेकानंद कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी इंटेसिफाईड आयईसी कॅम्पेन अंतर्गत आयोजित व्याख्यानात बोलताना पंचगंगा रुग्णालयाच्या आयसीटी समुपदेशिका सौ. सुरेखा जाधव यांनी - एच.आय.व्ही. ची कारणे, असुरक्षित लैगिक संबंध, दुषित सुईचा वापर, दुषित रक्ताचा वापर व आईकडून गर्भातील बाळाला संसर्गाचा धोका असल्याचे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, एच.आय.व्ही. एड्सला प्रतिबंध व जनजागृती करणेसाठी महाविद्यालयीन युवक युवतींचा सहभाग मोलाचा आहे. तसेच यावेळी त्यांनी उपलब्ध असलेल्या मोफत तपासणी व मोफत उचाराचाबाबतचीही माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. एच.जी.पाटील यांनी केले. आभार प्रा.सौ एस पी पंचभाई यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन आर.आर.सी. नोडल ऑफिसर मेजर सुनिता भोसले यांनी केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंडर ऑफिसर सायली वडकर हिने केले.
या कार्यक्रमास ज्युनि.सायन्स् विभागप्रमुख प्रा एम आर नवले, प्रा एस एल पाटील, प्रा एल एस नाकाडी, प्रा सौ पद्मजा पाटील, प्रा शलाका मुठाणे व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, एन.सी.सी. कॅडेट, एन.एस.एस. चे स्वयंसेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रबंधक श्री सचिन धनवडे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
विवेकानंद मध्ये एड्स जनजागृती व्याख्यान संपन्न.
|