बातम्या
आयुष निदान व उपचार शिबिराचे आजरा ग्रामीण रुग्णालयात आयोजन संपन्न
By Administrator - 3/30/2026 4:51:21 PM
Share This News:
आयुष निदान व उपचार शिबिराचे आजरा ग्रामीण रुग्णालयात आयोजन संपन्न
आजरा (हसन तकीलदार )*:-आजच्या धावपळीच्या आणि रासायनिक युगात आरोग्यासाठी आयुर्वेदाची कास धरणे काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने
आजरा ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आयुष सर्व रोग निदान शिबिर व उपचार मेळाव्यास रुग्णांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांचे हस्ते झाले. यावेळी डॉ.श्रद्धाआनंद ठाकूर यांनी आयुर्वेदाचे महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले. डॉक्टर अंजली देशपांडे यांनी दैनंदिन जीवनातील आयुर्वेद या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. सागर साव्यानावर यांनी होमिओपॅथी या विषयावर मार्गदर्शन दिले.
नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी या मेळाव्यास यावेळी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास आरोग्य आणि कुटुंब कल्याण केंद्र कोल्हापूरच्या उपप्राचार्य डॉ. वाडीकर मॅडम,आमदार प्रतिनिधी विजय थोरवत, उपनगराध्यक्ष सौ.पूजा डोंगरे , जिल्हा आयुष अधिकारी डॉ. लादे सर, डॉ. शेवाळे मॅडम( डीपीम आयुष )आदिजण उपस्थित उपस्थित होते. प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.सुरजीत पांडव यांनी केले. डॉ सुनील हसूरे, डॉ. प्रशांत चौगुले, डॉ. स्वाती पाटील, डॉ. सागर तेउरवाडकर,डॉ.स्वाती रेडेकर. यांनी रुग्णांना आयुष उपचार दिले. या शिबिरात 415 रुग्णांनी आपला सहभाग नोंदवला.
आयुष निदान व उपचार शिबिराचे आजरा ग्रामीण रुग्णालयात आयोजन संपन्न
|