बातम्या

आजऱ्यात पावसाला सुरवात हवेत गारवा

Aajra


By nisha patil - 6/23/2026 7:25:06 PM
Share This News:



**आजऱ्यात पावसाला सुरवात हवेत गारवा*

**हवेत दमटपणा वाढल्याने प्रोढ वाळवी बाहेर पडली*

**आजरा(हसन तकीलदार)*:-पावसाने ओढ दिली आणि सगळ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आणि प्रत्येक धर्मीय आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे प्रमाणे देवाला साकडे घालू लागला.

पावसासाठी कोणी दुआ केली तर कोणी देवाला गाऱ्हाणे,साकडे घातले. आज दि. 23/06/2026 रोजी दुपारपासून मुरवणीच्या पावसाला सुरवात झाल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. हवेतही गारवा वाढल्याचे दिसून आले. त्या बरोबरच हवेत दमटपणा वाढल्याने प्रौढ पंखवाली वाळवी बाहेर पडताना दिसली त्याचे चित्रण आमच्या प्रतिनिधीनी केले.

         पावसाळ्यात हवेत दमटपणा (ह्युमिडिटी) वाढल्यावर वाळवी (उधळी) लाकडी फर्निचर किंवा जमिनीतून बाहेर पडते.प्रौढ वाळवीला पंख फुटतात आणि नवीन वसाहत (वारूळ) तयार करण्यासाठी ती संध्याकाळच्या वेळी दिव्यांच्या किंवा पथदिव्यांच्या (लाईटच्या) प्रकाशाकडे आकर्षित होऊन थव्याने बाहेर उडते. पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा दमट हवामानात (विशेषतः संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी) वाळवी बाहेर पडते.वाळवीच्या वसाहतीमधील (राजा, राणी, कामगार, सैनिक) काही प्रजननासाठी सक्षम असलेल्या 'नर आणि मादी' वाळवीला पंख फुटतात.ते वारुळ, जमिनीतून किंवा फर्निचरमधून बाहेर पडून हवेत उडतात.हवेत उडताना त्यांचे मिलन (Mating) होते. त्यानंतर हे उडणारे कीटक जमिनीवर येतात, त्यांचे पंख गळून पडतात आणि ते नवीन वारूळ किंवा घरटं तयार करतात आणि ते जमिनीच्या खाली राहतात ते आपल्याला समजूनसुद्धा येत नाही. ज्यावेळी लाकडे किंवा फर्निचर ठेवली जातात त्यावेळी ही वाळवी बाहेर पडते आणि लाकूड फस्त करते.घरात वाळवीचा उपद्रव रोखण्यासाठी काही उपाय:सायंकाळी घराच्या खिडक्या व दारे बंद ठेवा, जेणेकरून उडणारे किडे घरात प्रवेश करणार नाहीत.घराबाहेरील लाईट्स बंद ठेवा किंवा प्रकाश घरात येणार नाही अशा प्रकारे रचना करा.वाळवी लागलेल्या लाकडावर कडुलिंबाचे तेल (Neem oil) किंवा वाळवीविरोधी औषधाची फवारणी करा.तुम्हाला घरातील लाकडी फर्निचरवर शेतातील पिकांवर वाळवीचा प्रादुर्भाव दिसू लागला तर जेणेकरून त्यावर योग्य उपाययोजना व औषधोपचार करता येईल.तुरटीच्या मदतीने तुम्ही वाळवीपासून सहज सुटका मिळवू शकता. यासाठी, अर्धा लिटर पाण्यात सुमारे ५००-६०० ग्रॅम पावडर विरघळवा. आता हे द्रावण एका स्प्रे बाटलीत ओता आणि वाळवीने ग्रस्त असलेल्या भागावर फवारणी करा. तुरटीच्या तीव्र वासामुळे वाळवी मरतील.घरातील ओलसरपणा टाळा. पाणी गळणाऱ्या पाईप्स किंवा नळ दुरुस्त करा.

भिंतींतील आणि जमिनीतील भेगा तात्काळ बुजवा.

फर्निचरची वेळोवेळी साफसफाई आणि पॉलिश करा.

कागदपत्रे, पुस्तके आणि कपडे हवेशीर, कोरड्या जागेत ठेवा.

वर्षातून किमान एकदा पेस्ट कंट्रोल करून घ्या.वाळवीला थेट सूर्यप्रकाश सहन होत नाही कारण त्यांच्या शरीरातील ओलसरपणा पटकन आटतो आणि त्यांना जिवंत राहणे कठीण होते. त्यामुळे लाकडी वस्तू, पुस्तके, कपाटाचे भाग, दरवाजे, खिडक्या यांसारख्या वस्तू अधूनमधून उन्हात ठेवणे फायदेशीर ठरते.उन्हाळ्यात सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सूर्यप्रकाश सर्वाधिक तीव्र असतो, त्यामुळे त्या वेळी वस्तू उन्हात ठेवा.वस्तू काही तासांसाठी उलटसुलट ठेवाव्यात, जेणेकरून सूर्यप्रकाश सर्व बाजूंनी पोहोचेल.


आजऱ्यात पावसाला सुरवात हवेत गारवा
Total Views: 766