बातम्या
आजऱ्यात मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखवला*
By nisha patil - 6/6/2026 8:19:02 PM
Share This News:
**आजऱ्यात मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखवला*
शेतीच्या पूर्वमशागतीना वेग येणार
आजरा(हसन तकीलदार)*:-सकाळपासून उष्म्याने हैराण झालेल्या आजरा शहरात आज दि. 6/5/2026 रोजी मान्सून पूर्व पावसाने जबरदस्त आणि दमदार आगमन करीत उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसह बळीराजालाही सुखद धक्का दिला आहे. पावसाच्या या दमदार एंट्रीमुळे शेतीकामांना वेग येणार असून भाताची तरवे, नाचण्याची ल्हवे पेरणीसाठी घात मिळणार आहे.
आज दुपारी 01:00 च्या सुमारास पावसाला सुरवात झाली गटारी तुडुंब भरल्यामुळे काहींच्या घरात पाणी शिरले आणि त्याचबरोबर रस्त्यावरही साचले होते.
याअगोदर धुळवाफ करून भात तरवे पेरलेल्याना तसेच ऊस पिकासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. रविवार व सोमवारी उघडीप मिळाली तर पेरणी आणि मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु होणार. खेडेगावात घरांची शेकारणी, लाकूडफाटा, शेणी गोळा करणे, जनवारांचे गवत सुरक्षित जागी साठवून ठेवणे, जमिनीची पूर्वमशागत, पेरणी अशा कामांची लगबग सुरु होणार. बिबियाण्यासाठी शेतीसेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. ऑनलाईन खतासाठी बुकिंग सुरु केली आहे आणि रसायनिक खत घेऊन जाण्यात काहीजण व्यस्त आहेत. सद्या मनुष्यबळ व मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जनवारांची कमतरता असल्याने शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळला आहे. ट्रॅक्टर आणि पॉवरट्रिलरने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा जादा कल असला तरी डिझेलचे दर वाढल्यामुळे नांगरणीचेही दर वाढले आहेत. खतांचे वाढलेले दर, शेतमजूरांची वाढलेली मजुरी, शेतीमालाला योग्य भाव नाही त्यामुळे उत्पादन खर्चही भागणे मुश्किल झाले आहे. त्यात वन्यप्राण्यांचा हैदोस अशा चौफेर माऱ्यामुळे बळीराजा ना ईलाजाने शेती करीत असल्याचे चित्र सद्या दिसत आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त, शेतीमालाला योग्य दर, आणि खत व डिझेलचे वाढलेले दर कमी केल्याशिवाय शेतकऱ्याला शेती परवडणार नाही असे काहींचे मत आहे. केवळ कर्जमाफी याला उपाय नाही असे म्हटले जात आहे.
आज मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार आगमन पेरणीसाठी आणि ऊसपिकासाठी चांगले व उपयुक्त ठरणार आहे. परंतु आजऱ्यात काही ठिकाणी गटारी तुंबल्यामुळे काहींच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे नगरपंचायतीने गटारिंची लवकरात लवकर सफाई करून काढलेली घाण व कचरा त्वरित उचलावा अशी नागरिकांतून मागणी होताना दिसत आहे.
आजऱ्यात मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखवला*
|