बातम्या
पाणीटंचाईवर आम आदमी पार्टीचा दिलासा!
By nisha patil - 11/6/2025 2:49:26 PM
Share This News:
पाणीटंचाईवर आम आदमी पार्टीचा दिलासा!
सूरज सुर्वे यांच्या पुढाकाराने घरोघरी टँकरद्वारे पाणीपुरवठा
शहरातील वर्षा नगर भागात पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले होते. या परिस्थितीत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि समाजसेवक सूरज सुर्वे यांनी पुढाकार घेत नागरिकांना तात्पुरता दिलासा दिला.
सूरज सुर्वे यांनी आपल्या वैयक्तिक प्रयत्नातून टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले आणि घरोघरी जाऊन पाणीवाटप केले. त्यांच्या या कार्यामुळे नागरिकांची गैरसोय काहीअंशी टळली असून, स्थानिकांनी त्यांच्या या सामाजिक भानाचे कौतुक केले आहे.
पाणीटंचाईच्या काळात प्रशासनाचे दुर्लक्ष असताना राजकीय पक्षाचे कार्यकर्ते समाजहितासाठी असे पुढे सरसावत आहेत, हे निश्चितच उल्लेखनीय आहे.
पाणीटंचाईवर आम आदमी पार्टीचा दिलासा!
|