बातम्या
शहरातील पाणी प्रश्नावर श्वेतपत्रिका काढा- आप चे प्रशासकांना निवेदन
By nisha patil - 4/30/2025 8:30:12 PM
Share This News:
आपकडून पाणीप्रश्नावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
कोल्हापूर – शहरातील पाणीपुरवठा योजनांतील वारंवार बिघाड आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर आप पार्टीने महापालिका प्रशासनाकडे श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.
थेट पाईपलाईन आणि शिंगणापूर योजना असूनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही. तसेच 90 MLD गरज असताना 250 MLD पाणी उपसा होत असूनही वितरण यंत्रणेतील अडचणी दूर झालेल्या नाहीत.
या पार्श्वभूमीवर योजनांची सद्यस्थिती, तांत्रिक अडचणी, गळती, अनधिकृत कनेक्शन यासह सर्व बाबींचा तपशील असलेली श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावर उत्तर देताना प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी विद्युत लाईन अंडरग्राऊंड करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून, शिंगणापूर योजना सक्षम करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.
यावेळी जल अभियंता घाटगे यांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. शहराध्यक्ष उत्तम पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील पाणी प्रश्नावर श्वेतपत्रिका काढा- आप चे प्रशासकांना निवेदन
|