बातम्या
तालुका कृषी विभाग व आत्मा अंतर्गत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
By nisha patil - 5/25/2026 9:56:45 PM
Share This News:
**तालुका कृषी विभाग व आत्मा अंतर्गत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
आजरा(हसन तकीलदार)*:-तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर अंतर्गत आज सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी दत्त मंदिर बहिरेवाडी तालुका आजरा येथे खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम "खतांचा संतुलित वापर व अल निनो मोहीम"," सोयाबीन,भात,भुईमूग लागवड तंत्रज्ञान" या विषयावर आयोजित करण्यात आला होता . या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रत्नजा सावंत( सरपंच बहिरेवाडी)या होत्या.या प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना भूषण पाटील( तालुका कृषी अधिकारी आजरा )यांनी बियाणे उपलब्धता महाडीबीटी पीएम किसान पिक स्पर्धा तसेच कृषी विभागाच्या इतर योजनांची माहिती दिली.
राजेंद्र वावरे (विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र कणेरी) यांनी जमिनीचे पोषण व सेंद्रिय कर्बाचे महत्त्व, हिरवळीचे खते व पिकांची फेरपालट, विविध जैविक निविष्ठा व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर याबाबत मार्गदर्शन केले.पांडुरंग काळे (विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र कणेरी) यांनी सोयाबीन व भात बीज प्रक्रियेचे महत्त्व, सोयाबीन लागवड पद्धत, एल निनो चा शेतीवरील परिणाम व उपाय योजना याबाबत माहिती दिली. पी.जी.पाटील( उप कृषी अधिकारी) यांनी हुमणी नियंत्रण बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.एस.बी.गडकरी (सहाय्यक कृषी अधिकारी) यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया बाबत मार्गदर्शन केले.तर विकास चोथे (सदस्य पंचायत समिती आजरा) यांनी माती परीक्षण करून पिक घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले.त्यांनी सांगितले की,मातीपरीक्षण केल्याने जमिनीत कोण कोणत्या अन्न द्रव्यांची कामतरता आहे. खत मात्रा कोणत्या द्याव्या लागणार याबाबतची माहिती मिळते व त्यानुसार खत मात्रा देता येतात.
कर्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन अमित यमगेकर (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक,आजरा )यांनी केले.
यावेळी भूषण पाटील (तालुका कृषी अधिकारी आजरा), विकास चोथे (सदस्य पंचायत समिती आजरा),राजेंद्र वावरे (मृद विभाग,कृषी विज्ञान केंद्र कणेरी),पांडुरंग काळे (कृषी विज्ञान केंद्र कणेरी),सुनील कुमार ( कृषी विज्ञान केंद्र कणेरी),एम.एस. फुले (मंडळ कृषी अधिकारी उत्तुर), विजयसिंह दळवी (उप कृषी अधिकारी उत्तुर-1), पी. जी. पाटील (उप कृषी अधिकारी उत्तुर-2), एस. बी.गडकरी (सहाय्यक कृषी अधिकारी बहिरेवाडी), अमित यमगेकर (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आजरा),ओमकार संकेश्वरी (कृषी सेवक आरदाळ ) याबरोबरच दऱ्याप्पा पाटील, शशिकांत शेवाळे, वसंत मिसाळ, शंकर पाटील,अर्जुन कुंभार, गोपाळ सावंत आदी शेतकरी उपस्थित होते.
तालुका कृषी विभाग व आत्मा अंतर्गत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
|