शैक्षणिक
आबिटकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा १०० टक्के निकाल
By nisha patil - 7/5/2026 12:06:09 PM
Share This News:
आबिटकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा १०० टक्के निकाल
गारगोटी प्रतिनिधी,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गारगोटी शहरातील श्री.आनंदराव आबिटकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, गारगोटी कॉलेजच्या सायन्य शाखेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थिनी आयेशा शिकलगार हिने 81.33% गुण मिळवून गारगोटी केंद्रात विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक पटकावला. तर नम्रता जावडेकर हिने 76.67% गुणांसह केंद्रात तृतीय, तर वैष्णवी चौगले 75.83% तसेच एन्जल रॉड्रिंक्स हिने 74.50% सई देसाई 73.67 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी अभिनंदन केले. तसेच या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असून विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन आणि पालकांचा पाठींबा यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले असल्याचे प्राचार्य तुकाराम माने यांनी सांगितले.
आबिटकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा १०० टक्के निकाल
|