बातम्या

नाम.आबिटकर यांच्या वाढदिनी रुग्णांना फळे वाटप व वृक्षारोपणाचा भरगच्च कार्यक्रम

Abitkar birthday 1


By nisha patil - 6/30/2026 3:28:17 PM
Share This News:



**नाम.आबिटकर यांच्या वाढदिनी रुग्णांना फळे वाटप व वृक्षारोपणाचा भरगच्च कार्यक्रम*

**पुढील वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करणार-तालुका अध्यक्ष संजय पाटील*

*आजरा(हसन तकीलदार)*:-कार्यसम्राट तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य नाम. प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत आजरा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटपाचा तसेच वृक्षारोपणाचा भरगच्च अशा कार्यक्रमाचे आयोजन आजरा तालुका शिवसेने तर्फे करण्यात आले होते.

     यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, तुमचे आमचे सर्वांचे लाडके मंत्री आबिटकर साहेबांचा आज 30 जून रोजी वाढदिवस आहे. या दिवशी बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण, रुग्णांना फळे वाटप तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालय आजरा येथे रुग्णांना फळे वाटप करून तसेच रुग्णालयाच्या बाहेर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले आहे. पुढच्या वर्षी आबिटकर साहेबांचा जन्मदिवस मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीर घेऊन साजरा करण्याचा संकल्प करतोय. आजरा तालुक्यात आजपर्यंत जेवढी रक्तदान शिबीरे झाली आहेत त्यापेक्षा उच्चांकी रक्तदान शिबीर आम्ही घेणार आहोत आणि रक्त पेढीसाठी रक्त संकलन करणार असे सांगितले.

    यावेळी शहरप्रमुख विजय थोरवत, मंदार बिरजे, काका देसाई, महेश खेडेकर, इंद्रजित देसाई, अमजदभाई माणगावकर(विशेष कार्यकारी अधिकारी), शरीफभाई खेडेकर, संतोष भाटले, दयानंद निऊंगरे, महेश दळवी, सुनील दिवेकर तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील,डॉ. वृषाली केळकर, डॉ. सागर तेऊरवाडकर, डॉ. सुरजीत पांडव, डॉ. अभिषेक नरहट्टी, डॉ. दयानंद उपासे,डॉ. अमीर मुजावर,ऊर्जादेवी पाटील(इन. सिस्टर), भूषण इंगवले, विक्रम गंधाडे, राजन तेऊरवाडकर (वाहन चालक)तसेच शिवसैनिकांसह इतर कर्मचारी उपस्थित होते.


नाम.आबिटकर यांच्या वाढदिनी रुग्णांना फळे वाटप व वृक्षारोपणाचा भरगच्च कार्यक्रम
Total Views: 539