बातम्या
तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी पोलिसांना आबिटकरांचे आदेश..
By nisha patil - 8/30/2025 3:05:16 PM
Share This News:
तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी पोलिसांना आबिटकरांचे आदेश..
जगात भारी कोल्हापुरी' – आबिटकर
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पोलिस प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की, तरुणाईला व्यसनांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी अवैध धंदे, गांजा-ड्रग्जसारख्या बेकायदेशीर उद्योगात गुंतलेल्या काळ्या धंदेवाल्यांवर कठोर कारवाई सुरू करावी. तसेच गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हुपरी येथील चांदी नगरचा राजा मंडळाच्या शिशमहल देखाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आबिटकर म्हणाले, “ज्या वनतारात प्राणी दाखवत नाहीत, तिथे माधुरी हत्तीणी आणून दाखवली जाते, ही कोल्हापूरकरांची कमाल आहे. मनात आले तर आपण काय करू शकतो, याची झलक यातून दिसते.”
तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी पोलिसांना आबिटकरांचे आदेश..
|