बातम्या

फरारी मुख्य आरोपी स्वप्निल पाटील करवीर पोलिसांच्या जाळ्यात

Absconding main accused Swapnil Patil in the net of Karveer police


By Administrator - 1/31/2026 6:30:39 PM
Share This News:



फरारी मुख्य आरोपी स्वप्निल पाटील करवीर पोलिसांच्या जाळ्यात

करवीर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ७२७/२०२५ अन्वये BNS कलम ९१, ३१९(२), १२५, २७८ तसेच वैद्यकीय गर्भपात कायदा कलम ३ व ४ इत्यादी कलमान्वये दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी स्वप्निल केरबा पाटील (वय ३६, रा. जय भवानी मंगल कार्यालय शेजारी, पाडळी खुर्द, ता. करवीर, जि. कोल्हापूर) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.

सदर आरोपीचा करवीर पोलीस कसोशीने शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी बागल चौक येथील शाहूमिल रोडवर, क्राऊन फर्निचर समोरील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर वास्तव्यास असून तो आज रात्री उशिरा त्या ठिकाणी येणार आहे. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून वॉच ठेवला असता आरोपी राहत्या घरात मिळून आला. त्यानंतर त्यास ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, करवीर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार राहुल देसाई, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, अमित जाधव तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रज्ञा पाटील यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.


फरारी मुख्य आरोपी स्वप्निल पाटील करवीर पोलिसांच्या जाळ्यात
Total Views: 140