विशेष बातम्या

सहकारातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती – राज्यमंत्री पंकज भोयर

Accelerating the rural economy through cooperation


By nisha patil - 7/8/2025 5:21:08 PM
Share This News:



सहकारातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती – राज्यमंत्री पंकज भोयर

कोल्हापूर, दि. ७ ऑगस्ट : सहकारी संस्था टिकल्या तर शेतकऱ्यांना वेळेवर निधी मिळतो आणि ग्रामीण अर्थव्यवस्था गतिमान होते, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केले.

कोल्हापुरात सेवा सोसायट्यांच्या संगणकीकरण व सचिवांच्या सक्षमीकरणावर आधारित कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

भोयर यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्याचा सहकारभाव राज्यासाठी दिशादर्शक आहे. ६०% पेक्षा अधिक सेवा संस्था संगणकीकृत झाल्या असून उर्वरित काम तातडीने पूर्ण होईल.

कार्यशाळेला आमदार अमल महाडिक, सहनिबंधक डॉ. महेश कदम, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्यासह गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सहकारातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती – राज्यमंत्री पंकज भोयर
Total Views: 115