बातम्या

कोल्हापूर : ‘खुद से जीत’ उपक्रमाला वेग – मंत्री हसन मुश्रीफ

Acceleration of the Khud Se Jeet


By nisha patil - 7/21/2025 10:21:58 PM
Share This News:



कोल्हापूर : ‘खुद से जीत’ उपक्रमाला वेग – मंत्री हसन मुश्रीफ

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यात ‘खुद से जीत’ या नावाने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेला आणखी गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकांच्या संमतीपत्राद्वारे शाळांमध्ये लसीकरण पूर्ण करून अभियान यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्ह्यातील १७ हजार मुलींना लस देण्याचे लक्ष्य असून ९ हजारांवर लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित लसीकरणासाठी पुढील दहा दिवसांत कॅम्प राबविण्यात येणार आहेत. यासोबतच डोळे तपासणी व चष्म्यांचे मोफत वाटप, तसेच १३ वर्षांवरील मुलींमध्ये स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी मोहिमाही राबवली जाणार आहे.

आरोग्य व शिक्षण विभागाच्या समन्वयाने हे उपक्रम राबवले जात असून, महिलांमध्ये आरोग्य जागरूकता निर्माण करण्यासाठी गावपातळीवर विशेष महिला ग्रामसभा आयोजित केली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.


कोल्हापूर : ‘खुद से जीत’ उपक्रमाला वेग – मंत्री हसन मुश्रीफ
Total Views: 109