बातम्या

*पेंढारवाडी ता. आजरा जवळ आयशर ट्रकचा ताबा सुटून अपघात

Accident near Pendharwadi


By nisha patil - 9/28/2026 1:45:14 PM
Share This News:



*पेंढारवाडी ता. आजरा जवळ आयशर ट्रकचा ताबा सुटून अपघात

*ट्रक चालकाचा जागीच मृत्यू

*आजरा(हसन तकीलदार):-आजरा उत्तूर मार्गावरील पेंढारवाडी गावाजवळील आंबेओहळ नाल्याच्या पुलानजीक रविवार दि. 27/09/2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजता आयशर मालवाहक ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून अपघात झाला या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
   

याबाबत आजरा पोलीस स्टेशनकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आयशर ट्रक क्र. MH -11-DV-1377 मालवाहतूक ट्रक घेऊन आजरा उत्तूर रोडवर वाहन चालक रामलखन गंगाराम जाधव (वय वर्षे 40 रा. निंबरगा कलबूर्गी ता. आलंद, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक )परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने, अविचाराने, भरधाव वेगाने सदर वाहन चालवून उत्तूर ते आजरा जाणारे रोडवर आंबेओहळ नाल्याच्या पुलाच्या पेंढारवाडी गावजावळील वळणावर रस्त्याच्या वळणाचा अंदाज न आल्याने त्याचा आयशर ट्रकवरील ताबा सुटून रोडच्या कडेला सखल भागात जाऊन ट्रक पलटी झाले आणि या अपघातात वाहन चालक रामलखन जाधव याचा गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला.

याबाबत सुभाष गुंडू आजगेकर (वय 43 पेंढारवाडी पोलीस पाटील) यांनी फिर्याद नोंद केली असून पोलीस हेडकॉंस्टेबल भदरगे यांनी फिर्याद नोंद करून घेतली असून सहाय्य्क पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉंस्टेबल मकानदार हे पुढील तपास करीत आहेत.
 

या पुलाजवळ अतितीव्र उतार व धोकादायक वळण असल्याने या ठिकाणी चालकाला अंदाज येत नाही व अपघात घडतात. त्यामुळे येथील उतार व वळण कमी करणे गरजेचे आहे असे नागरिकांचे मत आहे.


*पेंढारवाडी ता. आजरा जवळ आयशर ट्रकचा ताबा सुटून अपघात
Total Views: 39