बातम्या
मिरज गोळीबार प्रकरणातील आरोपी कोल्हापुरात अडकले! शस्त्रांसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
By Administrator - 6/27/2025 4:25:28 PM
Share This News:
मिरज गोळीबार प्रकरणातील आरोपी कोल्हापुरात अडकले! शस्त्रांसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
मिरज येथे भरदिवसा झालेल्या फायरिंग प्रकरणातील फरार आरोपी सुरज चंदू कोरे आणि त्याच्या पाच साथीदारांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिरोली एमआयडीसी येथील एका हॉटेलमधून शस्त्रांसह अटक केली. आरोपींच्या कब्जात गावठी पिस्तुल, दोन जिवंत राऊंड, लोखंडी सुरा, ९ मोबाईल हँडसेट आणि फॉरच्युनर कारसह सुमारे २२ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपींविरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून मिरज फायरिंग प्रकरणात सुरज कोरे फरार होता. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार आणि निरीक्षक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पीएसआय संतोष गळवे, वैभव पाटील, अमित मर्दाने, सत्यजित तानुगडे आदींचा सहभाग होता.
मिरज गोळीबार प्रकरणातील आरोपी कोल्हापुरात अडकले! शस्त्रांसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त
|