बातम्या
वडगाव खून प्रकरणातील आरोपी २४ तासांत जेरबंद
By nisha patil - 12/9/2025 2:51:52 PM
Share This News:
वडगाव खून प्रकरणातील आरोपी २४ तासांत जेरबंद
पोलिसांची गुप्त तपासातून यशस्वी कारवाई
पेठवडगाव डवरी गल्लीमध्ये संभाजी धर्मा साळुंखे (५०) यांचा खून करून फरार झालेला आरोपी किरण भीमराव जगताप (२५, रा. यादवनगर, कोल्हापूर) याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केवळ २४ तासांत अटक केली.
८ सप्टेंबरच्या मध्यरात्री डोक्यात लाकडी फळी मारून साळुंखे यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी मृताच्या पत्नी मीना साळुंखे यांनी वडगाव पोलिसात फिर्याद नोंदवली होती.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने तपास सुरू केला.
गुप्त माहितीच्या आधारे परिते येथील पोकरणेकर वस्तीमधून आरोपीला अटक करण्यात आली.प्राथमिक चौकशीत शाब्दिक वादातून खून झाल्याची कबुली आरोपीने दिली. पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत.
वडगाव खून प्रकरणातील आरोपी २४ तासांत जेरबंद
|