बातम्या

9 वर्षांच्या मुलीला त्रास देणारा आरोपी खोतवाडीत महिलांच्या तावडीत....

Accused of harassing 9yearold girl in Khotwadis custody


By nisha patil - 3/12/2025 12:11:48 PM
Share This News:



खोतवाडी गावात 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा घरापासून शाळेपर्यंत पाठलाग करून तिच्याशी चुकीचे वर्तन करणाऱ्या एका आरोपीला गावातील महिलांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या प्रकारामुळे खोतवाडी परिसरात तणाव पसरला आहे.

माहितीनुसार, आरोपी काही दिवसांपासून त्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्याशी गैरवर्तन करीत होता. घाबरलेल्या पीडित मुलीने अखेर सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. संतापलेल्या कुटुंबीयांनी आणि महिलांनी आरोपीला पकडून त्याला धडा शिकवला.

दरम्यान, महिलांनी आरोपीला चोप देत असताना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे खोतवाडी गावात तणाव निर्माण झाला असून ग्रामस्थांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


9 वर्षांच्या मुलीला त्रास देणारा आरोपी खोतवाडीत महिलांच्या तावडीत....
Total Views: 28