बातम्या
मोक्यात जामिनावर सुटलेले आरोपी दरोड्याचा गुन्ह्यात जेरबंद
By nisha patil - 4/19/2025 11:26:28 PM
Share This News:
मोक्यात जामिनावर सुटलेले आरोपी दरोड्याचा गुन्ह्यात जेरबंद
मोक्याच्या गुन्ह्यातील जामिनावर सुटलेल्या आरोपींना खंडणी प्रकरणी पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलीय. विशाल अविनाश माने, अजय अविनाश माने अशी राजारामपुरी येथे राहणाऱ्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह प्रेम नावाच्या एका विधी संघर्ष बालकाचाही या गुन्ह्यात समावेश आहे.
राजारामपुरी परिसरामध्ये तिघा आरोपींची मोठी दहशत आहे. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून ते फरार होते. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना या आरोपींना पुणे जिल्ह्यातील चाकण येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलीय. पुढील तपासासाठी त्यांना गोकुळ शिरगाव पोलिसांकडे सोपवण्यात आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, अरविंद पाटील, महेश कोरवी, प्रदीप पाटील, विशाल खराडे, गजानन गुरव, योगेश गोसावी शिवानंद मठपती यांनी केली
मोक्यात जामिनावर सुटलेले आरोपी दरोड्याचा गुन्ह्यात जेरबंद
|