बातम्या
खून प्रकरणातील फरार आरोपी आदर्श शेंडेकर पोलिसांच्या जाळ्यात
By nisha patil - 8/11/2025 5:49:43 PM
Share This News:
खून प्रकरणातील फरार आरोपी आदर्श शेंडेकर पोलिसांच्या जाळ्यात
कोल्हापूर – राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या लखन अण्णाप्पा बेनाडे यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आदर्श अरविंद शेंडेकर (रा. योगेश्वरी कॉलनी, पाचगाव रोड, कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा घडल्यापासून तो फरार होता.
गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार कृष्णात पाटील यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शेंडेकरच्या घराजवळ सापळा रचला. आरोपी घरी परतताच पोलिसांनी अचानक छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.
सदर आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
खून प्रकरणातील फरार आरोपी आदर्श शेंडेकर पोलिसांच्या जाळ्यात
|