बातम्या

अतिरिक्त महानिदेशक (ADG) मेजर जनरल विवेक त्यागी यांचे कोल्हापूरात आगमन

Additional Director General


By nisha patil - 11/24/2025 4:19:12 PM
Share This News:



अतिरिक्त महानिदेशक (ADG) मेजर जनरल विवेक त्यागी यांचे कोल्हापूरात आगमन

कोल्हापूर दि : 24 (जिमाका) येथील NCC गट मुख्यालय (कोल्हापूर) च्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे दि 25 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत विशालगड ते पन्हाळा या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे           

 या मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे तसेच NCC ची शिस्त,नेतृत्व गुण आणि राष्ट्रीय सेवा मुल्यांची जाणीव या विद्यार्थांना व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजना (NCC) महाराष्ट्र संचालकालयाचे अतिरिक्त महानिदेशक मेजर जनरल विवेक त्यागी हे आज कोल्हापूरात आले. यावेळी ब्रिगेडियर आर.के पैठणकर यांनी त्यांचे स्वागत केले .
                     

मेजर जनरल त्यागी यांनी खा.शाहू महाराज छ.यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.या भेटीत कोल्हापूरमध्ये NCC च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या युवक विकास उपक्रमांवर चर्चा केली.त्यानंतर श्री त्यागी यांनी NCC गट मुख्यालय,कोल्हापूर येथे भेट दिली यावेळी 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या NCC कॅडेट्सनी त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' दिला.याप्रसंगी
मेजर जनरल त्यागींनी कोल्हापूर गट मुख्यालयांतर्गत कार्यरत सर्व NCC युनिटच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.या संवादामध्ये प्रशिक्षणाची गुणवत्ता, कॅडेट कल्याण, तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये NCC उपक्रमांचे प्रभावी नियोजन करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली.यावेळी ब्रिगेडियर आर.के.पैठणकर यांनी, प्रशिक्षण वर्षात गट मुख्यालयांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती श्री त्यागी यांना देवून उदया होणाऱ्या ऐतिहासिक ‘छत्रपती शिवाजी ट्रेल ट्रेक कॅम्प’च्या नियोजना बाबत सादरीकरण केले.यावेळी मुख्यालयाचे इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते .


अतिरिक्त महानिदेशक (ADG) मेजर जनरल विवेक त्यागी यांचे कोल्हापूरात आगमन
Total Views: 83