बातम्या
अधिक मासानिमित्त सारामृत पारायण व नामस्मरण सोहळा उत्साहात संपन्न
By nisha patil - 6/13/2026 10:33:49 PM
Share This News:
अधिक मासानिमित्त सारामृत पारायण व नामस्मरण सोहळा उत्साहात संपन्न
मंगळवार पेठेतील स्वामीभक्त प्रसाद जाधव व परिवार यांच्या वतीने तसेच जोशी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला सारामृत पारायण, विष्णुसहस्त्रनाम, कुंकुमार्चन व नामस्मरणाचा धार्मिक सोहळा चौंडेश्वरी हॉल येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
अधिक मासाला धार्मिक व आध्यात्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व असून त्याला पुरुषोत्तम मास असेही संबोधले जाते. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात वैयक्तिक, सामाजिक हित व विश्वशांतीसाठी प्रार्थना व संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमास सुमारे पाचशेहून अधिक महिला व भाविकांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने आनंद व कृतार्थतेची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी प्रसाद जाधव, माधुरी काटकर, यशस्विनी जाधव, मुकुंद काटकर, आर्यनिल जाधव तसेच गुरुबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक परंपरा व भक्तीभाव जपणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
अधिक मासानिमित्त सारामृत पारायण व नामस्मरण सोहळा उत्साहात संपन्न
|